COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये पोलिसांकडून डान्स बारवर छापे मारण्याची मोहिम जोरदार सुरु झाली आहे. 


या छाप्यांदरम्यान बारमालक आणि बारबालांना वाचविण्यासाठी जे चोर कप्पे आहेत याचा थांगपत्ता पोलिसांना लागलाय. यामुळे आता या गुप्त रुम्सवर पालिकेच्या सहाय्यानं उध्वस्त करण्याची कारवाई केली जात आहे. 


उल्हासनगरमधील काही डान्सबारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावावर मुलींच्या अश्लील नृत्यां बरोबरच देहविक्रीचा व्यवसायही केला जात आहे. या सेक्स रेकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. परंतु पोलीस या बारवर छापा मारतात.त्यावेळी या अल्पवयीन मुली गायब होतात आणि पोलिसांच्या हाती लागत नाहीत. 


काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ‘सी हॉक’ या डान्सबारवर छापा मारला त्यावेळी पोलिसांनाही चक्रावून टाकणा-या काही बाबी समोर आल्या. या डान्सबारमध्ये काही गुप्त दरवाजे बनविले असून त्यामध्ये काही बारबाला लपवल्या जात होत्या. 


बारमधील बाथरुम्स आणि मेकअप रुम्समधून या चोरवाटा गुप्त रुमपर्यंत जात होत्या. यामुळेच आता डान्सबारमधील या गुप्त रुम्स तोडण्याची कारवाई पोलिसांनी पालिकेच्या सहाय्यानं सुरु केलीय. 


उल्हासनगर मधील ‘सी हॉक’,‘बे वाच वृंदावन’ आणि ‘चांदनी’ या बारमध्ये ही कारवाई केली जात आहे.