खानदेशातील धुळे जिल्ह्यात १५ मिनिटं पाऊस
मुंबईत पहाटे पावसाच्या सरी कोसळल्या त्याच दरम्यान सातारा आणि खानदेशातील धुळे जिल्ह्यात पाऊस झाला. हा अवकाळी पाऊस १५ ते २० मिनिटं होता. यानंतर खानदेशात पुन्हा उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई : मुंबईत पहाटे पावसाच्या सरी कोसळल्या त्याच दरम्यान सातारा आणि खानदेशातील धुळे जिल्ह्यात पाऊस झाला. हा अवकाळी पाऊस १५ ते २० मिनिटं होता. यानंतर खानदेशात पुन्हा उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
अचानक तापमान खाली आले आणि अचानक वाढलं तर निश्चितच त्याचा परिणाम नागरिकांच्या प्रकृतीवर होणार आहे. मुंबईतही आज दिवसभर उन-सावलीचं वातावरण दिसून येत आहे.
धुळे जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग, साक्री तालुका तसेच पिंपळनेरसह परिसरातील चिकसे, सामोडे, बलहाणे, देशशीरवाडे, दिघावे, जेबापुर, धोगडे, सुकापुर या ठिकाणी आज पहाटेपासूनच ढगाळ वातावरण होते. अखेर सकाळी साडेसातच्या सुमारास ढगांचा गडगडाट पाऊस सुरू झाला आणि १५ मिनिटे पाऊस झाला.