मोठ्या विश्रांतीनंतर लातूरमध्ये पावसाची हजेरी
मोठ्या विश्रांतीनंतर लातूरमध्ये पावसानं हजेरी लावलीय. जुन जुलैमध्ये समाधानकारक पाऊस पडल्यानं जिल्ह्यात 100 टक्के पेरण्या झाल्या. मात्र त्यानंतर जवळपास महिनाभर पावसानं दडी मारली. त्यामुळे खरीपाची पिकं धोक्यात आली होती.
लातूर : मोठ्या विश्रांतीनंतर लातूरमध्ये पावसानं हजेरी लावलीय. जुन जुलैमध्ये समाधानकारक पाऊस पडल्यानं जिल्ह्यात 100 टक्के पेरण्या झाल्या. मात्र त्यानंतर जवळपास महिनाभर पावसानं दडी मारली. त्यामुळे खरीपाची पिकं धोक्यात आली होती.
मात्र गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून त्यामुळे पिकाला जीवदान मिळणार आहे. जिल्ह्यात 1जुन ते 28 ऑगस्टपर्यंत 516 मिमी पावसाची नोंद करण्यात आलीय.
अर्थात सरासरीच्या 65 टक्के पाऊस झालाय. दोन दिवसांच्या पावसानं पुन्हा पिकं हिरवीगार झालीय. पण शहराला पाणीपुरवठा करणा-या मांजरा धरणक्षेत्रात अजुनही पाऊस न पडल्यानं धरण कोरडंच आहे. थोडक्यात काय तर पाऊस असुनही लातुरकरांची भविष्यातली पिण्याच्या पाण्याची चिंता अजुनही कायम आहे.