यवतमाळ : यवतमाळच्या वणी आणि मारेगाव परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं. वादळ वाऱ्यासह आलेला हा पाऊस तासभर जोरदार बरसला. सोसाट्याचा वारा त्यात दमदार पाऊस यामुळं शहरी भागात नागरिकांची त्रेधातिरपट उडाली. तर ग्रामीण भागात शेतक-यांना पावसानं फटका दिला. शेतातील हरभरा आणि गहू या पिकांची पावसामुळे हानी झाली. 


उभा गहू आडवा झाला तर शेतातील तुरीचे ढीगही पावसानं भिजले. तूर खरेदी बंद असल्यानं शेत शिवरासह, शेतक-यांच्या घरी आणि बाजार समितीच्या यार्डात तूर साठवून ठेवण्यात आलीय. पावसामुळे या तुरीला नुकसान पोहोचलं. वादळामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली तर काही काळ वीज पुरवठा देखील खंडित झाला.