नाशिक : मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजीत स्मारकावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच नाशिकमध्ये आज इतिहासकालीन शस्त्र संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न होतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबासाहेब पुरंदरे यांनी संग्रहीत केलेल्या शिवकालीन तलवारी, ढाल, भाले, दांडपट्टा जवळून पाहण्याचं भाग्य नाशिककरांना लाभलंय. दोन मजली संग्रहालयात चित्रमय रूपात शिवचरित्र दाखवलं जाणार आहे. वरच्या मजल्यावर शिवकालीन शस्त्रं ठेवण्यात आली आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव संग्रहालयाला देऊन राज ठाकरेंनी शिवसेनेनवर कुरघोडी केलीय.


पाहा काय म्हणाले राज ठाकरे?