पुणे : प्रसार माध्यमांच्या नजरेतून पाहायचं झालं तर मी कायम आग लावत असतो, ओकत असतो पण आज त्यालाच तुम्ही आग शमवण्याच्या बंबावर बसवले मार्मिक वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे.


पुण्यात कैलासवासी केशवराव गणपतराव जगताप अग्निशमन संग्रहालयाच उदघाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. अग्निशमन दलातील कर्मचारी खूप कष्ट घेत असतात. जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवतात पण त्यांच्या पाठीवर कोणाकडूनही कौतुकाची थाप पडत नाही अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली.