12 डॉक्टर असूनही...
भाजपचे 12 आमदार डॉक्टर असूनही त्यांना राज्याची नाडी सापडलेली नाही असा टोला राज ठाकरे यांनी भाजपला मारला आहे.
डोंबिवली: भाजपचे 12 आमदार डॉक्टर असूनही त्यांना राज्याची नाडी सापडलेली नाही असा टोला राज ठाकरे यांनी भाजपला मारला आहे.
इंडियन मेडीकल असोसिएशन डोंबिवलीतर्फे पहिली आयएमए अवॉर्ड सेरेमनी डोंबिवलीत झाली. त्यात डोंबिवलीतल्या काही नामांकीत डॉक्टर्सचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित होते.
यावेळी काही डॉक्टर मंडळींनी वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यथा मांडल्या. त्यावर भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी सत्ताधारी भाजपमध्ये 12 आमदार डॉक्टर असल्याचं म्हटलं. हाच मुद्दा पुढे धरून राज यांनी हा टोला दिला.