नागपूर : मुंबईत विदर्भवाद्यांची पत्रकार परिषद मनसेच्या कार्यकर्त्यांनी उधळल्यानंतर नागपूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुतळा जाळण्यात आला. महात्मा गांधी चौकात विदर्भवादी नेत्यांनी हे आंदोलन केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेने पत्रकार परिषद उधळल्याने त्याला उत्तर देत विदर्भवादी कार्यकर्त्यांनी यापुढे विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात आंदोलन करत राज ठाकरे यांचा पुतळा जाळणार असल्याची घोषणा केली. ३ आणि ४ ऑक्टोबरला विदर्भातच्या प्रतिकात्मक विधीमंडळाचे आयोजन कऱणार असल्याचे या नेत्यांनी सांगितले.


दरम्यान, राज ठाकरेंनी नागपूरमधल्या काटोलमधून निवडणूक लढवून दाखवावी आणि निवडून यावं, असे आव्हान काटोलचे आमदार आशिष काटोल यांनी दिले आहे. वेगळ्या विदर्भाला सामान्य लोकांचा विरोध आहे, असा राज ठाकरे यांचा ग्रह असल्यास त्यांनी माझ्या काटोल मतदारसंघातून निवडणूक लढवावी आणि निवडून यावं, असे ते म्हणालेत.