राज ठाकरेंचा नारायण राणेंवर `प्रहार`
दहीहंडीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
ठाणे : दहीहंडीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. जेलमध्ये गेल्यावर नशीब फळफळतं हे राणेंकडे बघूनच अनेक तरुण शिकले आहेत, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. तसंच प्रहार- पेपर नव्हे चॉपर असा सणसणीत टोलाही राज ठाकरेंनी हाणला आहे.
ज्या गोविंदांवर खटरे दाखल केले आहेत त्यांच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे उभी राहणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. दहीहंडीला आचारसंहिता आखून द्या, एकतर्फी निर्णय देऊन चालणार नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे.
तुम लडो मै कपडे संभालता हूं असं म्हणून राज ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या तरुणांना तुरुंगात टाकण्याचा घाट घातला, असा आरोप नारायण राणेंनी केला. होता. तुरुंगात गेल्यावर तरुणांची आयुष्य बर्बाद झाली, तर त्याला जबाबदार कोण असा सवालही राणेंनी विचारला होता.