शिवसेना-भाजपमधल्या भांडणावर बोलले रामदास आठवले
रिपाईचे नेते खासदार रामदास आठवले यांचा सेना-भाजपला इशारा
जळगाव : काँग्रेस-राष्ट्रवादीने जे केले तेच सेना भाजप करतंय, त्यामुळे भांडत बसू नका नाहीतर पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीला तुमची सत्ता जाईल असा इशारा युतीच्या घटकपक्ष असलेल्या रिपाईचे नेते खासदार रामदास आठवले यांनी सेना-भाजपला दिला आहे.
जळगावात बोलत असतांना आठवले बोलले की, सेना-भाजपच्या भांडणामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालाय. त्यांनी एकत्रित राहून काम केलं पाहिजे अशी अपेक्षा करत आपण या संदर्भात मुख्यमंत्री तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं ते बोलले.
शिवसेना सत्तेत असूनही विरोधकांसारखी वागतेय त्यामुळे युतीत घटक पक्षामध्ये असणाऱ्या रामदास आठवले यांना जो प्रश्न पडलाय तोच प्रश्न महाराष्ट्रातील जनतेलाही पडला आहे. आठवलेच्या मध्यस्थीनंतर तरी हे भांडण बंद होईल का हे पहावं लागेल.