अखंड महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या आव्हानाला भाजपचं प्रत्युत्तर
हुतात्मा स्मारकावर जाऊन पारदर्शकतेची शपथ घेणाऱ्यांनी तिथेच अखंड महाराष्ट्राचीही शपथ घ्यावी
पुणे : हुतात्मा स्मारकावर जाऊन पारदर्शकतेची शपथ घेणाऱ्यांनी तिथेच अखंड महाराष्ट्राचीही शपथ घ्यावी, असं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला केलं होतं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरेंना याच मुद्द्यावरून प्रत्युत्तर दिलं आहे.
असंतोष असताना राज्यांचं विभाजन होता कामा नये अशी भाजपची भूमिका असल्याचं रावसाहेब दानवेंनी म्हटलंय. भाजप छोट्या राज्यांच्या संकल्पनेला नेहमीच पाठिंबा देत आलं आहे, पण त्याचा अर्थ जनतेला मान्य नसताना विभाजन करणे हा भाजपचा अजेंडा नसल्याचं दानवेंनी स्पष्ट केलंय.