युती सन्मानपूर्वक होत असेल तर करावी अन्यथा...- दानवे
युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर आहेत, युती सन्मानपूर्वक होत असेल तर करावी, अन्यथा स्वबळावर लढावे असं आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी म्हटलंय.
पुणे : युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर आहेत, युती सन्मानपूर्वक होत असेल तर करावी, अन्यथा स्वबळावर लढावे असं आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी म्हटलंय.
शिवसेनेकडून आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्यानंतर दानवेंनी हे वक्तव्य केलंय. आम्ही युतीच्या चर्चेसाठी तयार आहोत असंही दानवे म्हणाले. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
तसेच भाजपमध्ये गुन्हेगारांना प्रवेश दिले जात नाहीत. उमेदवारी तर नाहीच नाही. जे चोर मार्गानं आले त्यांनाही उमेदवारी देणार नाही असं असही दानवेंनी यावेळी स्पष्ट केलं.