डॉक्टरनं बलात्कार केल्याचा सहकाऱ्याचा आरोप, औरंगाबादमधली घटना
औरंगाबादेत एका डॉक्टरनं लग्नाचं आमिष दाखवून सहकारी डॉक्टरवर गेली दोन वर्ष बलात्कार केल्याचा आरोप महिला डॉक्टरनं केला आहे.
औरंगाबाद: औरंगाबादेत एका डॉक्टरनं लग्नाचं आमिष दाखवून सहकारी डॉक्टरवर गेली दोन वर्ष बलात्कार केल्याचा आरोप महिला डॉक्टरनं केला आहे.
सिडकोच्या एका खाजगी रुग्णालयात हे दोघंही सोबत काम करीत होते. सोबत रहात सुद्धा होते. मात्र आता हा डॉक्टर या महिला डॉक्टरला तू माझ्या जातीची नाही म्हणून लग्न करू शकत नाही असे कारण देतोय असा या महिलेचा आरोप आहे.
त्यामुळे याबाबतची तक्रार तिनं सिडको पोलिसांत दाखल केली आहे. यावरून या आरोपी डॉक्टरला अटक कऱण्यात आली आहे.
हा मुलगा आणि त्याच्या घरच्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या मुलीनं केला आहे, तर डॉक्टर मुलगा काल लग्न करायला तयार झाला होता मात्र मुलाच्या वडिलांनी त्याला लग्न करू दिले नाही असंही ही मुलगी सांगतेय. या प्रकरणी पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे