उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे नगरसेवक सुभाष मनसुलकर यांच्या विरोधात एका महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका 40 वर्षाच्या महिलेने शिवसेना नगरसेवक सुभाष मनसुलकर यांच्या विरोधात विठ्ठलवाड़ी पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविला आहे. 


2015 साली आपल्या मालमत्तेच्या वादा संदर्भात मदत घेण्यासाठी गेलो असता चाकुचा धाक दाखवत सुभाष मनसुलकर यांनी लैंगिक अत्याच्यार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


मात्र सुभाष मनसुलकर यानी हे सर्व प्रकरण बनावट असून, आपल्या विरोधात विरोधकांचे हे एक षडयंत्र आहे असं म्हटलंय.


सुभाष मनसुलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल होतच त्यांची पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली. मात्र अद्याप पोलिसांनी याप्रकरणी मनसुलकर यांना अटक केलेली नाही.