उस्मानाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार
उस्मानाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर पोलीस उपनिरीक्षकाने बलात्कार केल्याची घटना घडलीय. या नराधमाने रिव्हॉल्व्हरची भीती घालून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर पोलीस उपनिरीक्षकाने बलात्कार केल्याची घटना घडलीय. या नराधमाने रिव्हॉल्व्हरची भीती घालून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
याप्रकरणी आरोपी पीएसआय प्रेम सुखदेव बनसोडे याला गजाआड करण्यात आलंय. मूळ उस्मानाबादचा रहिवाशी असलेला आरोपी सध्या सांगलीच्या विश्रामबाग पोलीस स्टेशनला कार्यरत आहे.
उस्मानाबादच्या आनंदनगर पोलीस स्टेशन 376 आणि बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी पीएसआय प्रेम बनसोडेला तत्काळ अटक करण्यात आलीय.