भंडारा : एका १६ वर्षीय पीडित मुलीला एका महिन्यापूर्वी आरोपी प्रियकराने फिरायला नेले होते. तेथेच आरोपीने तिच्‍यावर बळजबरी केली. यावेळी आरोपीचे २ मित्रही तेथे आले आणि त्‍यांनीही पीडित मुलीवर बळजबरी केली. मात्र पीडित मुलगी या नराधमांचा प्रतिकार करू शकली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुलीचे आरोपींनी अश्लिल व्हिडियो आणि फोटो काढले. पीडित मुलीला ब्‍लॅकमेल करून, जीवे मारण्‍याची धमकी दिली


एवढंच नाही नराधमांनी पीडित मुलीला तुझ्या आईला जीवे मारू अशी धमकी दिली. या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्‍यास फोटो व्हायरल करू अशी धमकी त्‍यांनी दिली. बदनामीपोटी पीडित मुलीने या प्रकाराची माहिती कुणाला दिली नाही.