१ अल्पवयीन बालिकेवर बलात्कार, दुसरीची हत्या
दोन अल्पवयीन बालिकांवर अत्याचार झाले असून यातील एका बालिकेस नराधमाने गळा आवळून ठार केल्याचा प्रकार घडला आहे.
नाशिक : जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एकाच दिवशी दोन खळबऴजनक प्रकार घडले आहेत. दोन अल्पवयीन बालिकांवर अत्याचार झाले असून यातील एका बालिकेस नराधमाने गळा आवळून ठार केल्याचा प्रकार घडला आहे. दिंडोरी तालुक्यातील मालेदुमाला येथे पहिली घटना घडली असून यामध्ये सात वर्षीय बालिकेवर नात्यातीलच नराधमाने अत्याचार केले.
ती नाव सांगेल म्हणून त्याने वायरने गळा आवळून तीचा खून केल्याचे समोर आले आहे. विलास महाले असे या नराधमाचे नाव असून पोलिसांना त्याला अटक केली आहे. तर दुसर्या एका घटनेत एका पोल्ट्री फार्ममध्ये मजुर असलेल्या दांम्पत्याची चार वर्षीय बालिकेवर तेथील काम करणाऱ्या मजुराणे अत्याचार केला. पंचेचाळीस वर्षीय रविंद्र भास्कर देशमुख याला अटक करण्यात अली आहे.
या प्रकरणामुळे मालेदुमाला आणि वणी परिसरात संतप्त नागरीकांनी निषेध करत रस्ता रोको आंदोलन केले. या दोन्ही प्रकरणांमध्ये बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मालेदुमालाच्या घटनेत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.