पुणे : व्हॅलेंटाईन डेची पार्टी साजरी झाल्यानंतर एका तरुणीवर बलात्कार कऱण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलीये. या प्रकरणातील आरोपी फिरोज महंमद शेख याला पोलिसांनी अटक केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हडपसरच्या उच्चभ्रू वस्तीत ही घटना घडली. काही दिवसांपूर्वीच पिडीत तरुणी आणि तिच्या मैत्रिणी तेथे राहायला आल्या होत्या. यादरम्यान या तिघींची तेथील जीम प्रशिक्षकांशी ओळख झाली. व्हॅलेंटाईन डे निमित्त या तरुणींनी घरी पार्टी ठेवली होती. या पार्टीसाठी त्यांनी जीम प्रशिक्षकालाही बोलावले होते. यावेळी त्या जीम प्रशिक्षकासोबत फिरोज तेथे आला होता. 


पार्टी संपल्यानंतर या तरुणी झोपायला गेल्या. पार्टीत उशिर झाल्याने जीम प्रशिक्षक आणि फिरोजनेही तेथेच हॉलमध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. यावेळी पहाटेच्या सुमारास फिरोजने संधी साधत झोपेत असलेल्या तरुणीवर बलात्कार केला. 


दरम्यान, पिडीत तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या तरुणाला पोलिसांनी अटक केलीय.