रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भरती झालेल्या उमेदवारांना गाठून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या रँकेटचा पर्दाफाश लाचलुचपत विभागाने केला आहे. या प्रकारानंतर आरोग्य विभागाची भरती प्रक्रियाच वादाच्या भोवऱ्यात सापडलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागाच्या कर्मचारी बेबीनंदा खामकर आणि दिव्यांका यादव या आरोग्य सेविका असून त्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयात करण्यात आली. 2015मध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाची भरती झाली. या भरतीमधील यादी प्रसिद्ध होण्याआगोदरच ही यादी दिव्यंका यादव यांच्या घरी पोहचली होती.


या यादीतल्या पररज्यातील एका उमेदाराकडून त्यांनी चार लाख रुपयांची मागणी केली. यातली उरलेली 50 हजारांची रक्कम घेताना लाचलूचपत विभागानं त्यांना रंगेहात पकडलं. या कारवाईत दिव्यांका यादवसह तिचा पतीही पोलिसांच्या जाळ्यात आडकला. या भरतीत नियुक्ती झालेल्यांचा उमेदवारांचा प्रोबेशन कालावधी एप्रिलमध्ये संपत होता. हे पैसे दिले नाहीत तर त्यांचा सीआर खराब करण्याची धमकी दिली जाते होती.  


या दोघांची खातेनिहाय चौकशी सुरु झालीय. तर या दोघांकडे लाखोंचे घबाड जमवल्याचे पुढे येतय. दिव्यांका यादव यांच्या नावावर तर 65 लाखांचा बंगला आहे. तर आलीशान गाड्या देखील या दोघींकडे मिळून आल्यात. लाचलुचपत विभाग या दोघींची चौकशी करत आहे. 


मात्र 2015 सालापासून आरोग्य विभागातील बदलीबाबत या मुळे प्रश्नचिन्हं उपस्थित झालय. या दोघी भरती प्रकियेनंतर त्या उमेदवारांना गाठून त्यांच्याकडून पैसे उकळत होत्या. त्यामुळे या प्रकणात मोठे रँकेट असल्याच्या संशयावरुन आता या दोघींची खातेनिहाय चौकशी सुरु झालीय.