रेकॉर्डब्रेक : दीड तासात १,९५० पुशअप्स!
भंडारा जिल्ह्यातले धनराज चौधरी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचं नाव नोंदवण्यासाठी सरसावले आहेत.
भंडारा : भंडारा जिल्ह्यातले धनराज चौधरी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचं नाव नोंदवण्यासाठी सरसावले आहेत.
४६ वर्षीय धनराज चौधरी यांनी दीड तासात १ हजार ९५० पुश अप मारले आहेत. भंडारा शहारातल्या बहिगेश्वर व्यायाम शाळेत त्यांनी हे पुश अप मारले. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येनं भंडारावासीयांनी गर्दी केली होती.
गुरुवारी पहाटे पाच वाजल्यापासून त्यांनी भारतीय पद्धतीनं पुश अप मारायला सुरुवात केली. त्याचं केलेलं विडिओ शुटिंग धनराज चौधरी लंडनला गिनीज बुकमधल्या नोंदीसाठी धाडणार आहेत.
विशेष म्हणजे या आधी एका तासात १ हजार ४५० पुश अप मारलेल्या चौधरी यांचं नाव, लिम्का बुक रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.