सोलापूर : अवघ्या महाराष्ट्रासह देशाला आपल्या 'सैराट' तालावर थिरकायला लावणारी 'आर्ची' लवकरच याच सिनेमाच्या कन्नड रिमेकमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. परंतु, सध्या ही आर्ची अर्थात रिंकू राजगुरू चित्रपटाच्या नाही तर दुसऱ्याच गोष्टीमध्ये बिझी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमची लाडकी आर्ची सध्या दहावीची बोर्डाची परीक्षा देतेय. 'सैराट' प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या वाढत्या गर्दीमुळे रिंकूला शाळेत जाणंही कठिण होऊन बसलं होतं. त्यामुळे तिनं बाहेरूनच परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान ती 'सैराट'चा कन्नड रिमेक 'मनसू मल्लिगे' या सिनेमाच्या चित्रिकरणातही व्यस्त होती.


रिंकू पहिल्यांदाच दहावीच्या परीक्षेला बसलीय. आजपासून सुरू झालेल्या दहावीच्या परिक्षेला अकलुजच्या जिजामाता कन्या प्रशाला केंद्रावर तिचा नंबर लागला होता. परीक्षा देण्यासाठी रिंकू जेव्हा या शाळेत उपस्थित झाली तेव्हाही या केंद्राच्या प्रमुख मंजुषा जैन यांनी पुष्पगुच्छ देत रिंकूचं स्वागत केलं.


'मनसू मल्लिगे' या सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार विजेती रिंकू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर मुख्य अभिनेता म्हणून सत्यप्रकाश यांचा मुलगा निशांत दिसणार आहे.