यवतमाळ : येथे झालेल्या भीषण अपघातात मध्य प्रदेशातील निवृत्त पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पत्नीचा दु्र्दैवी मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यवतमाळमध्ये पुलाचे कठडे तोडून गाडी वर्धा नदीच्या कोरड्या पात्रात कोसळली. हे सगळे तिरुपतीहून देवदर्शन करुन जबलपूरकडे परतत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.


या घटनेत मध्य प्रदेशचे निवृत्त पोलीस अधीक्षक मनमोहनसिंग गिल आणि त्यांची पत्नी दलवीरकौर गिल यांचा करुण अंतर झालाय. तर त्यांचा मुलगा राजविरसिंग कौर गिल हा दुर्घटनेत जखमी झालाय. त्याच्यावर वडणेर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.