ठाण्यात कंपनीच्या कार्यालयावर दरोडा, २ कोटींची रोकड लुटली
एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कंपनीच्या कार्यालयावर ठाण्यात दरोडा टाकण्यात आला. ठाणे मेंटल हॉस्पिटल परिसरात ही घटना घडलीय. या दरोड्यात २ कोटींहून अधिक रोकड लुट्ल्याचा अंदाज आहे. पहाटे साडे तीन वाजता ही घटना घडलीय. चोरट्यांनी या कार्यालयातले सीसीटीव्हीमधले रेकॉर्डरही काढून नेलेत.
ठाणे : एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कंपनीच्या कार्यालयावर ठाण्यात दरोडा टाकण्यात आला. ठाणे मेंटल हॉस्पिटल परिसरात ही घटना घडलीय. या दरोड्यात २ कोटींहून अधिक रोकड लुट्ल्याचा अंदाज आहे. पहाटे साडे तीन वाजता ही घटना घडलीय. चोरट्यांनी या कार्यालयातले सीसीटीव्हीमधले रेकॉर्डरही काढून नेलेत.
चेक मेट प्रायव्हेट सर्विसेस असे या कंपनीचे नाव आहे. ठाण्यात मेन्टल हॉस्पिटलच्या बाजूला ही कंपनी आहे. येथील हिरादीप सोसायटीत चेकमेट कंपनीचे कार्यालय आहे.
मंगळवारी पहाटे सात ते आठ अज्ञात आरोपींनी चाकू, बंदुकीचा धाक दाखवून २ करोड रुपयांची रोकड लुटली.
लूट केलेल्या रक्कमेत आणखी वाढ होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाणे पोलिसांनी या दरोडया प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.