नागपूर : दातांच्या डॉक्टरकडे उपचारासाठी गेलेल्या रूग्णाला भलत्याच संकटाचा सामना करावा लागला आहे. भंडारा जिल्ह्याचे रहिवासी असलेले बी. एस. पोटदुखे आपल्या दातांवर रूट कॅनॉल ट्रिटमेंट करायला स्थानिक डेंटिस्टकडं गेले होते. उपचारादरम्यान डेंटिस्टच्या हातातून दातात खड्डा पाडायची ड्रिल सुटली आणि ती श्वसन नलिकेत जाऊन अडकली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेर नागपूरच्या गेटवेल रूग्णालयात त्यांना आणण्यात आलं. डॉ. राजेश सुवर्णकार आणि त्यांच्या टीमनं अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर ब्रांकोस्कोपी उपचार प्रक्रियेच्या माध्यमातून ही टोकदार डेंटल ड्रिल बाहेर काढली, त्यामुळे पोटदुखेंचे प्राण वाचले.