ठाणे : 'मेपल कंपनी'च्या कार्यालयातल्या बॅनरची मनसेनं नासधूस केली. ५ लाखात घर योजनेतून हजारोंना गंडा घालणाऱ्या मेपलचे संचालक पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थक असल्याचा आरोप मनसेने केलाय. 


मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे येथे आज झालेल्या आंदोलनात मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, नौपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. मेपलने ठाण्यातल्या ग्राहकांचीही फसवणूक केल्याचा मनसेने आरोप केला आहे.



 


भाजपचे कनेक्शन अखेर उघड 


पुणे शहरातील वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या ‘आपलं घर’मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सवलतीत घर मिळेल, अशी जाहिरात करणार्‍या ‘मॅपल ग्रुप आणि भाजपचे कनेक्शन अखेर उघड झाले आहे. पुणे पालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांच्या बीडकर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम व्यवसाय कंपनीत मॅपलचे नवीन अग्रवाल संचालक असल्याची धक्कादायक माहिती पुढे आलेय.


पुण्यात मनसेची तोडफोड 


दरम्यान, माझा मॅपलशी कोणताही संबंध नाही, असे गणेश बीडकर यांनी म्हटलेय. इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम व्यवसाय कंपनीत मॅपलचे सचिन अग्रवाल यांचा भाऊ नवीन अग्रवाल संचालक आहे. सर्वप्रथम पुण्यात मनसेने मॅपलच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. आज ठाण्यातही मनसेने आपला हिसका दाखवला.