सरसंघचालकांकडून घरवापसीचं समर्थन
घरवापसीच्या मुद्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मत मांडलंय.
रत्नागिरी : घरवापसीच्या मुद्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मत मांडलंय. काहीजण लाचारी पोटी धर्म परिवर्तन करतात, पण त्यांचं मुळ वेगळं असतं याचा त्यांना विसर पडतो.
अशांना त्या वृक्षांच्या मुळावर पुन्हा उभ करणं म्हणजे घरवापसी होय, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीजधाम इथं आयोजित महारक्तदान संकल्पपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते.