संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेश केतकर यांचे निधन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेश केतकर यांचं निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्यावर लातूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
लातूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेश केतकर यांचं निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्यावर लातूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
लातूरच्या विेवेकानंद हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शारीरिक प्रमुखसह सर कार्यवाह, प्रचार प्रमुख आदी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे होत्यात. गेली साडे चार वर्ष ते रुग्णालयात भरती होते.
केतकर हे मूळचे पुण्याचे. काही काळ नोकरी केली. त्यानंतर ते संघाचे प्रचारक म्हणून सक्रीय झालेत. सांगली, सोलापूर येथे काम केल्यानंतर ते मुंबई महानगर प्रचारक, महाराष्ट्र प्रांताचे शारीरिक शिक्षण प्रमुख म्हणून काम पाहिले.