आरटीओकडून अनधिकृत रिक्षावर धडक कारवाई सुरु
या घटनेनंतर वाहतूक पोलीस, महात्मा फुले पोलीस आणि आरटीओकडून अनधिकृत रिक्षावर धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे.
कल्याण : कल्याणमध्ये रिक्षाचलकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी रिक्षा चालक सलीम पठाणनं स्थानक परिसरात बस चालकाला मारहाण केली. त्यांच्या अंगठ्याचा चावा घेतला.
या घटनेनंतर वाहतूक पोलीस, महात्मा फुले पोलीस आणि आरटीओकडून अनधिकृत रिक्षावर धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे.
या कारवाईत आतापर्यत ५४ रिक्षा जप्त करण्यात आल्यात. स्टेशन परिसरात रिक्षा चालकाची मुजोरी वाढत असल्यानं रिक्षा चालकावर १ मार्चपासून कारवाई सुरु करण्याचा निर्णय आरटीओकडून घेण्यात आला होता.
पुढील आठ दिवस ही कारवाई सुरु राहणार आहे, या रिक्षा ६० दिवस परत दिल्या जाणार नसून त्यांना अडीच हजार रुपयाचा दंड आकारला जाणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.