धुळे : मिठाचा तुटवडा निर्माण होणार अशी अफवा पसरल्यामुळे धुळ्यात मिठ घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. रात्री 10 वाजेपासुन बाजारपेठेत मीठ घेणा-यांची गर्दी सर्वत्र दिसू लागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढती गर्दी पाहता पोलिसांनी नागरिकांना मिठाच्या तुटवड्याची अफवा असल्याच समजवलं. मात्र नागरिक ऐकण्याच्या मानसिकतेत नसल्याने पोलीसांना जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. 


यादरम्यान अंधाराचा फायदा घेत अनेकांनी मिठाच्या गोण्याच्या गोण्या दुकानातून लपांस केल्या.