सांगली : राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलांचा विवाह थाटात साजरा झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह, अनेक मंत्री आणि सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती लावली. लग्न समारंभावेळी सुद्धा सदाभाऊंच्या शर्टाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला चर्चेचा विषय ठरला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृषी आणि पणन मंत्री सदाभाऊ खोत यांच्या सुनील आणि सागर या दोन्ही पुत्रांचा विवाह सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर  येथे  मोठ्या थाटात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह डझन भर मंत्री  आणि  सर्व पक्षीय नेत्यांनी  या विवाह प्रसंगी उपस्थिती लावली. शेतकरी नेत्याच्या मुलाच्या या लग्नात राजकीय नेते अधिकारी आणि सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विशेष बाब म्हणजे, लग्न समारंभा वेळी सुद्धा सदाभाऊंच्या शर्टाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला दिसला.


सदाभाऊ  खोत  यांचे ज्येष्ठ सुनील आणि कुरळप येथील सुरेश पवार यांची ज्येष्ठ कन्या गीतांजली तर सदाभाऊ खोत यांचे कनिष्ठ चिरंजीव सागर आणि जाब येथील जयकुमार शिंदे यांची  ज्येष्ठ कन्या मोहिनी यांचा विवाह सव्वा बाराच्या  सुमारास झाला. या विवाहास मुख्यमंत्री फडणवीस  यांचासह अनेक कॅबिनेट आणि राज्यमंत्री , अनेक आमदार उपस्थित होते.


यामध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, गृहराज्य मंत्री दीपक केसरकर, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर,विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार राजू शेट्टी, खासदार प्रीतम मुंडे, खासदार संजय काका पाटील, माजीमंत्री जयंत पाटील माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या सह अनेक आमदार, लोक प्रतिनिधी आणि सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.