नगर : कोल्हार-घोटी महामार्गावर एसटी बसचा अपघात झाल्याची घटना घडलीये. अकोले तालुक्यातील शेंडीजवळील घाटात हा अपघात झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संगमनेर-कसारा बसच्या स्टेरिंगचा रॉड तुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यावर अडकली. दरम्यान ही बस कठड्यावर अडकल्याने मोठी जिवितहानी टळलीये. 


या बसमधून तब्बल ४७ प्रवासी प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी सुखरुप आहेत.