साई चरणी रेकॉर्ड ब्रेक सहा कोटींचे दान
रामनवमी उत्सव काळातील ३ दिवसात शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी साईभक्तांनी सुमारे साडे सहा कोटीचे दान अर्पण केलय हा दानाचा आकडा उत्सवाच्या दानातील रेकॉर्ड ब्रेक आकडा आहे. या रामनवमीला हैद्रबादच्या साईभक्ताने तब्बल 12 किलो सोन्याच दान साईंना चढवलय
शिर्डी : रामनवमी उत्सव काळातील ३ दिवसात शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी साईभक्तांनी सुमारे साडे सहा कोटीचे दान अर्पण केलय हा दानाचा आकडा उत्सवाच्या दानातील रेकॉर्ड ब्रेक आकडा आहे. या रामनवमीला हैद्रबादच्या साईभक्ताने तब्बल 12 किलो सोन्याच दान साईंना चढवलय
रामनवमीच्या तीन दिवसीय उत्सव काळात भाविकानी दान स्वरूपात अर्पण केलेल्या रकमेची आज मोजणी करण्यात आली. यामध्ये देणगी काऊंटरवर 48 लाख रुपये तर दान पेटीत 1 कोटी 54 लाख रुपयांचे दान आला असून नोट बंदी नंतर साईंना आँन लाईन दान करण्याच प्रमाण साईभक्तांच वाढले आहे.
आँऩलाईन, चेक, डी.डी. आणि क्रेडीट कार्डच्या माध्यमातूनही रेकॉर्ड ब्रेक 53 लाख रुपयांच दान साईंना आलय या उत्सव काळात साईंना सोन्याचे आणि चांदीचे भरभरून दान आलय आहे.
हैदराबाद येथील भास्कर पार्थ रेड्डी यांनी 12 किलो सोन दान केले आहे. त्या पासुन साईबाबांच्या समाधीचे कठडे बनविण्यात आले आहे. रामनवमीला संध्याकाळी विधीवत पूजा करत ते साईंच्या समाधीला बसविण्यात आले आहेत.
या वर्षीच्या दानात वस्तू रुपानेही महत्वाचे दान प्राप्त झाले असून यात 8 लाखांचे नोटा मोजण्याचे मशीन विजया बँकेने दिलय. साईंना या वर्षी चांदीचेही मोठे दान प्राप्त झाल असून तब्बल 65 किलो चांदी पासुन मखर बनविण्यात आली आहे. ती साईबाबांच्या द्वारकामाईतील फोटोला बसविण्यात आलय. साईबाबांना साईभक्त रोख स्वरुपात दान पेटीत दान टाकतात, एका भक्तांने साई संस्थानला दोन चांदीच्या दानपेटया अर्पण केल्या आहे. या साई समाधी जवळ दान टाकण्या साठी ठेवण्यात आल्या आहेत.
साई संस्थानाकडे आहे किती कोटी
शिर्डीच्या साईबाबांना भक्तांनी दान करण्याच प्रमाण दिवसे दिवस वाढतच आहे. गेल्या काही वर्षात साईबाबा संस्थानच्या दान पेटीत भक्तांनी भरभरुन दान केल्याने साईबाबांच्या गंगाजळतही घसघशीत वाढ झाल्याच दिसुन येतय. साई संस्थानची स्थापना सन 1922 साली झाली. त्या नंतर 1923 साली पहिला वार्षिक अहवाल प्रसिध्द करण्यात आला त्या वेळी साईसंस्थानच उत्पन्न केवळ 3200 रुपये इतके होत. त्यात गेल्या 93 वर्षात कमालीच उत्पन्न वाढल्याच दिसून येतय. सध्या साई संस्थानची विवीध बँका,रोखे असे मिळुन 1800 कोटींची गुंतवणूक आहे. साई संस्थानकडे आज मीतीला 380 किलो सोने आणि 4428 किलो चांदी जमा आहे. साई संस्थानचा खर्च प्रामुख्याने भक्तांसाठी चालविल्या जाणाऱ्या प्रसादालय, रुग्णालये, शाळा, कर्माचाऱ्यांचे पगार यावर मोठ्या प्रमाणात होत.