अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाने नववर्षात योजनांचा पाऊस पाडलाय. नवीन वर्षात भाविकांच्या देणगीतून मोफत भोजनप्रसाद देण्याबरोबर संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात आता मोफत तपासणी आणि मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या पहिल्या बैठकीत या घोषणा करण्यात आल्यात. या बैठकीत 27 निर्णय घेतले असून यांत प्रामुख्याने गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षेसाठी साई आयएएस अकादमी सुरु करण्यात येणार आहे. 


तिरुपती म्हणजे केशदान तसेच शिर्डी म्हणजे रक्तदान ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यानुसार दर गुरुवारी रक्तदान दिवस ठेवत शिर्डीसह देशभरातील साईमंदिरात याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे साई संस्थांनी सांगितले.


 याशिवाय पालख्यांसाठी पालखी निवारे, विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी साई प्लॅनेटोरिअम, खगोलीय अभ्यासासाठी 25 अद्ययावर टेलिस्कोप, संतांची महती दर्शवणारे वॅक्स म्युझियम उभारण्यात येणार आहे.