सातारा : कऱ्हाडमधील सल्या चेप्या गोळीबारप्रकरणी ६ जणांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कुख्यात गुंड सलीम शेख उर्फ सल्या चेप्यावर सुमारे ३ वर्षापूर्वी  जिल्हा न्यायालयात झालेल्या गोळीबार करण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणात ६ संशयीतांना ७ वर्षे सक्त मजुरी आणि प्रत्येकी २ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा न्यायाधिश एम आर. देशपांडे यांनी ही शिक्षा ठोठावली. 


या प्रकरणात पिस्तल पुरवणारा जळगावचा सुयेश मुळूक माफीचा साक्षीदार झाला होता. त्याशिवाय ३ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तपासी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली.


जयवंत सर्जेराव साळवे, युवराज सर्जेराव साळवे, किरण गुलाब गावीत, मंदार कृष्णदेव कदम, संकेत नारायण पवार आणि अभिनॆदन रतन झेंडे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.