रत्नागिरी : महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून निर्मल तट अभियान राबवण्यात येतंय. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीच्या भाट्ये किनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय किर्तीचे वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी सुरेख वाळू शिल्पाचा नमुना सादर केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समुद्राच्यामधून एक महारष्ट्रीय महिला किनाऱ्यांची स्वच्छता राखा असा संदेश देणारं सुरेख वाळू शिल्प साकारण्यात आलंय. सुदर्शन पटनाईक यांच्या टिमनी काही तासांच्या परिक्षमानंतर हे वाळू शिल्प साकारलं. 



यात ही महिलेची नाकातली नथ आणि अर्थ चंद्रकोराची टिकलीची अदाकारी पाहण्यासारखी होती. या वाळू शिल्पाच्या माध्यमातून किनारी स्वच्छतेचा संदेश दिला गेला. तर पटनाईक यांनी गानकोकीळा लता दिदिंना अनोखी भेट त्यांच्या वाढदिवसाला दिली. त्यांच्या प्रतिकृतीचे हुबेहूब वाळू शिल्प त्यांनी साकारले आहे.