येरवडा कारागृहातून संजय दत्त बाहेर
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटावेळी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या संजय दत्तची येरवाडा कारागृहातून सुटका झालीये.
पुणे: 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटावेळी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या संजय दत्तची येरवाडा कारागृहातून सुटका झालीये.
सुप्रीम कोर्टानं सुनावलेल्या शिक्षेच्या आठ महिने आधीच संजय दत्तची येरवडा जेलमधून सुटका झालीये. मात्र या सुटकेविरोधात कर्जदार जामीनदार हक्क बचाव कृती समितीने येरवडा जेलबाहेर स्टंटबाजी केली. सुटकेविरोधात कर्जदार जामीनदार हक्क बचाव कृती समितीने येरवडा जेलबाहेर स्टंटबाजी केली.
समितीच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी येरवडा जेलबाहेर येऊन बॅनर फडकावले. पोलिसांनी या आंदोलकांना हुसकावून लावले. एकीकडे येरवड्याबाहेर हे आंदोलन होत असताना संजय दत्तच्या मुंबईच्या वांद्रे इथल्या इम्पिरीयल हाईट्स या घराबाहेर त्याच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आलीय. संजय दत्तच्या सुटकेच्या निमित्ताने जागोजागी मोठमोठे होर्डिंग्स लावण्यात आलेत. तुरुगांतून बाहेर आल्यानंतर संजय दत्तने जमिनीला स्पर्
दरम्यान येरवडा जेलमधून सुटल्यावर संजय दत्त थेट चार्टड विमानानं मुंबईला येणार आहे. मुंबईत आल्यानंतर तो सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे.