अमरावती : निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या उमेदवारांचा माज दाखवणाऱ्या या बातमीमुळे कदाचित तुम्हाला धक्का बसू शकतो... किंवा तुम्हाला तुमचा राग अनावरही होऊ शकतो.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही धक्कादायक आहे अमरावतीतून... अमरावती पदवीधर मतदार संघातले काँग्रेसचे उमेदवार संजय खोडके यांनी संस्थाचालक आणि प्रध्यापकांना चक्क 'निवडणुकीनंतर बघून घेऊ' अशा शब्दांत धमकी दिलीय. 


विरोधीगटाचे काम करीत असल्याने निवडणूक होऊ दे... मग बघतो, असं म्हणत प्राध्यापकांना धमकावण्याची या उमेदवाराची मजल गेलीय. 


याप्रकरणी मेघश्याम तरडे यांच्या तक्रारीनंतर अमरावतीमधल्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये कलम 171 - क , 506 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.