यवतमाळ : परंपरागत विरोधकांपेक्षा सत्तेतला मित्र पक्ष खरा शत्रू असून, पाठीत खंजीर खुपसणा-या या मित्राचा बंदोबस्त करायचा आहे. अशी आगपाखड महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी यवतमाळमध्ये केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन करत, शिवसेनेनं यवतमाळमध्ये भव्य मिरवणूक काढली. भाजपाची भावना कपटी असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 


जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं, त्यांनी या मिरवणुकीद्वारे प्रचाराचा बिगुल फुंकला. पांढरे कपडे, गळ्यात भगवा शेला आणि गळ्यात ओळखपत्र अशा रुपातल्या शिवसैनिकांच्या शिस्तबद्ध पथसंचलनानं यावेळी यवतमाळकरांचं लक्ष वेधलं.