मुंबई : दैनिक सामनातील वादग्रस्त व्यंगचित्राप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ आता सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही दिलगिरी व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माफी मागितली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यंगचित्र हा जाणूनबुजून झालेला प्रकार नसून तो निव्वळ अपघात होता असं राऊत यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. कुणाच्याही भावना दुखावल्या जाव्यात, अपमान व्हावा असा त्यामागे हेतू नव्हता असंही स्पष्टीकरण राऊत यांनी दिलं आहे.


सामनातील व्यंगचित्रावरुन मराठा समाज आणि खासकरुन माता भगिनींचा अपमान झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करुन वादावर पडदा टाकत आहे अशा शब्दांत राऊत यांनी आपला माफीनामा सादर केला आहे.