सोनं आणि पैशांसाठी संतोष पोळनं केले खून?
सातारा जिल्ह्यातल्या वाई हत्याकांडात नवीन माहिती समोर आली आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातल्या वाई हत्याकांडात नवीन माहिती समोर आली आहे. डॉ संतोष पोळनं पैसे आणि सोन्यासाठी सहा जणांचा बळी घेतल्याचं तपासात पुढं आलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे याच प्रकरणात धुळ्यातील एक डॉक्टर बेपत्ता झाल्याचीही तक्रार नोंदवण्यात आली आहे. डॉ. संतोष पोळनं मंगल जेधेच्या खुनाआधी आणखी पाच खून केल्याची खळबळजनक कबुली दिली आहे. 2003 ते 2016 या कालावधीमध्ये संतोष पोळनं हे सहा खून केले आहेत.
डॉ. संतोष पोळचा खुनी इतिहास
23 मे 2003 ला त्यानं सुरेखा चिकणेचा पहिला खून केला.
12 ऑगस्ट 2006 ला वनिता गायकवाडचा खून करून तिला डोम धरणात फेकून दिलं.
15 ऑगस्ट 2010 ला जगाबाई पोळचा काटा त्यानं काढला.
10 डिसेंबर 2015 ला नथमल भंडारीचा खून डॉ. पोळनं केला.
17 जानेवारी 2016 ला त्यानं सलमा शेखचा बळी गेला.
जून 2016 मध्ये डॉ. पोळनं मंगला जेधेंचा खून केला.