पिंपरी चिंचवड महापालिकेची सारथी योजना देशभर
स्मार्ट सिटीमध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश झाला नसला, तरी केंद्र सरकारला इथल्या योजनांची दखल घ्यावी लागतेय. महापालिकेने सुरू केलेली सारथी योजना देशभर लागू करण्याचे आदेश केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने सर्वच राज्यांच्या सचिवांना दिलेत.
पिंपरी चिंचवड : स्मार्ट सिटीमध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश झाला नसला, तरी केंद्र सरकारला इथल्या योजनांची दखल घ्यावी लागतेय. महापालिकेने सुरू केलेली सारथी योजना देशभर लागू करण्याचे आदेश केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने सर्वच राज्यांच्या सचिवांना दिलेत.
नागरिकांच्या समस्यांचा तातडीने निपटारा व्हावा, महापालिकांच्या योजनांची त्यांना योग्य माहिती मिळावी यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने 2013 साली सारथी योजना सुरू केली होती. शरद पवारांपासून अनेकांनी या योजनेचं कौतुक केलं होतं.
आता ही योजना देशपातळीवर अंमलबजावणीसाठी सज्ज आहे. केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने सर्वच राज्यांच्या सचिवांना त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेत.
मात्र सारथी योजना देशभरात लागू करण्यात आली असली, तरी पिंपरी चिंचवडचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश न झाल्याबद्दलची हळहळही व्यक्त होत आहे.
सारथी योजना कार्यान्वित झाली तेव्हा नागपूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही पिंपरी चिंचवडला भेट देत उपक्रमाची माहिती घेत कौतुक केलं होतं.
स्मार्ट सिटी योजनेत सहभाग झाला नसल्याने पिंपरी चिंचवडमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय. मात्र केंद्र सरकाला महापालिकेची ही उत्तम योजना देशभर लागू करावी लागली याचा अभिमानही बाळागला जात आहे.