मुंबई : सतीश माथूर हे राज्याचे नवे पोलीस महासंचालक असणार आहेत. सतीश माथूर सध्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आहेत. सतीश माथूर हे 1981 च्या तुकडीचे भारतीय पोलीस सेवेतले अधिकारी आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यमान पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडून सतीश माथूर पोलीस महासंचालकपदाची सूत्रं स्वीकारतील. प्रवीण दीक्षित यांचा कार्यकाळ आजच संपत असल्यामुळे सतीश माथूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माथूर हे महासंचालक झाल्यामुळे एसीबीच्या महासंचालक पदाची जागा रिक्त झाली आहे. या ठिकाणी कोणाची वर्णी लागणार याबाबत मात्र अजूनही निर्णय झालेला नाही.