सावित्रीबाई फुले विद्यापिठात मारहाणीनंतर आता निषेध
सावित्रीबाई फुले विद्यापीठात शनिवारी संध्याकाळी एसएफआय आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीवरून सुरू झालेलं रणकंदन अद्याप शमलेलं नाही.
पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठात शनिवारी संध्याकाळी एसएफआय आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीवरून सुरू झालेलं रणकंदन अद्याप शमलेलं नाही.
आज एसएफायचे विद्यार्थी विद्यापीठ परिसरात आंदोलन करण्याच्या तयारीत होते. सुरुवातीला त्यांना पोलिसांनी निदर्शनं करण्यास परवानगी नाकराली. पण नंतर विद्यापीठ परिसरात 10 मिनिटं निषेध आंदोलन करण्यास परवानगी देण्यात आली.
दरम्यान पोलीसांनी अभाविप पुण्यातल्या कौन्सिल हॉल समोर मोर्चास परवानगी दिली. त्यानंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात शनिवारी झालेल्या हाणामारीचा, तसंच दिल्लीतल्या रामजस कॉलेजमध्ये झालेल्या घटनेचाही तीव्र निषेध केला.