लातूर : जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील भंगार-चिंचोली गावात अवैध सावकारी करणाऱ्या एका सावकाराने सावकारीतून एकाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. भंगार-चिंचोली गावातील परमेश्वर लांडगे हा इसम गावात अवैधरित्या खाजगी सावकारीचा धंदा करीत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र गावातील ४२ वर्षीय उत्तम ढगे हे सावकारीच्या धंद्यात परमेश्वर लांडगेला अडसर ठरत होते. त्यामुळे परमेश्वर लांडगेने, आपले आई,वडील आणि भावाला सोबत घेऊन सावकारकीमध्ये अडथळा ठरणाऱ्या उत्तम ढगे यांना जबर मारहाण केल्याचा आरोप आहे. ज्यात उत्तम ढगे यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. 


याप्रकरणी बाळु ढगे यांच्या फिर्यादीवरुन निलंगा तालुक्यातील कासारशिरसी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात  गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच आरोपीना अटकही करण्यात आली आहे.