महाड : येत्या पाच जूनला महाड जवळ असणाऱ्या सावित्रीच्या पूलाचं लोकापर्ण होणार आहे. पुलाचं बांधकाम आता अंतिम टप्प्यात आलंय. केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गवरील महाड इथला सावित्री नदीवरील पूल अतिवृष्टीमुळे 3 ऑगस्ट 2016 ला वाहून गेला होता. या दुर्घटनेत 15 पेक्षा जास्त प्रवासी मृत्युमुखी पडले होते.