मुंबई : स्कूल बस असोसिएशननं 15 नोव्हेंबरपासून पुकारलेला बंद मागे घेतल्यामुळे राज्यातल्या लाखो पालकांना दिलासा मिळाला आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल पंपावर एक हजारच्या नोटा स्वीकारायला सरकारनं परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे स्कूल बस असोसिएशननं पुकारलेला बंद मागे घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला. या निर्णयानंतर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याचं कारण देत स्कूल बस असोसिएशननं बंदचं हत्यार उगारलं होतं. दिवाळीच्या सुट्टीनंतर पंधरा तारखेपासून पुन्हा शाळा सुरु होत आहेत. तेव्हाच असोसिएशननं बस बंद करण्याचा इशारा दिल्यामुळे पालकांचं टेन्शन वाढलं होतं.