रत्नागिरी  : रत्नागिरी येथील करबुडे फाट्यावर एका बसला भीषण अपघात झाला आणि या बसमधील ६ जण गंभीररित्या जखमी झाले तर २४ जण किरकोळ जखमी झालेत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भिवंडी येथी ही बस तीन दिवस रत्नागिरी येथे फिरण्यासाठी आली होती मात्र येतानाच वाटेत गणपतीपुळ्याला जात असताना या बसवरील चालकाचा ताबा सुरूटला आणि बस रस्त्यावर पलटी झाली...


दोन पलटी खल्ल्यानंतर बस पूर्णपणे रस्त्यावर आडवी झालेली होती अखेर स्थानिक आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी बसमधील जखमींना बस बाहेर काढलं आणि रत्नागिरीच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये त्यांना पाठवण्यात आलेलं आहे 


बसमध्ये चालक धरून एकुण ३२ जण होते यातील तब्बल ३० जण जखमी झाले असून त्यातील ६ जणांची प्रकृती अतिक्षय गंभीर आहे....


नाताळच्या सुट्टीनिमित्त भिवंडीहून हे सर्वजण रत्नागिरी फिरण्यासाठी आले होते मात्र करबुडे फाट्याजवळ आल्यानंतर यांच्या बसला भीषण अपघात झालाय...गंभीररित्या जखमी असणा-यांना मुंबई येथे हलवण्यात येणार आहे.