शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
राज्यातला साखरेच्या साठ्यावरील मर्यादा काढण्याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.
मुंबई : राज्यातला साखरेच्या साठ्यावरील मर्यादा काढण्याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख, राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते. ऊस खरेदी कर माफ करावा अशी मागणी साखर संघानं केली, मात्र याबाबत सकारात्मक चर्चा करण्याचं आश्वासन बैठकीत देण्यात आलं.