नोटबंदीचे ऑपरेशन यशस्वी पेशंट डेड - शरद पवार
देशात काळा पैशाची समस्या होती, काळा पैसा चलनातून हद्दपार व्हायला हवा अशी भूमिका सर्वांची होती, पण त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नसल्याने ऑपरेशन यशस्वी पण पेशंट डेड अशी अवस्था झाल्याची उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली.
सातारा : देशात काळा पैशाची समस्या होती, काळा पैसा चलनातून हद्दपार व्हायला हवा अशी भूमिका सर्वांची होती, पण त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नसल्याने ऑपरेशन यशस्वी पण पेशंट डेड अशी अवस्था झाल्याची उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली.
मोदींनी एका हुकूमाद्वारे ८६ टक्के चलन रद्द केले, त्यामुळे शेती मालाचा दर ढासळले. सहकारी बँकाना घातलेल्या निर्बंध अनेक समस्या उद्भवल्या. पण एक मात्र नक्की की दारूचा धंदा तेजीत होता.
नोटबंदीच्या काळात भाजपने पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या. नोटबंदीमुळे भाजपला जे जमले ते आम्हांला जमू शकले नाही, असेही पवार यांनी सांगितले.
विधान परिषदेच्या निकालावरून अस्वस्थ झालो आहे. कोणी किती प्रसाद घेतला याची माहिती आहे. यांची संपूर्ण माहिती आणि यादी माझ्याकडे आहे.
शरद पवार यांनी महापालिका निवडणुकीत काँग्रेसशी युती बाबत म्हणाले की,
सध्या धोरणात्मक निर्णय घेतला आहे. तिथल्या तिथल्या संघटनेच्या लोकांना अधिकार दिलेत. एकत्र जाता आले तर आनंद होईल. पण समंजसपणा दोन्ही बाजूने दाखवला पाहिजे.