पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मिश्किल बाजू आज पहिल्यांदा पाहिला मिळाली आहे. सुधीर गाडगीळ यांनी पुण्यात आज घेतलेल्या मुलाखतीत 'प्रतिभा'वंत पवार दिसून आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



 


प्रतिभाताईंबद्दल 


स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार वितरण समारंभात सुधीर गाडगीळांनी यांनी ही मुलाखत घेतली. गाडगीळांनी प्रतिभा पवारांना विचारलं की ५० वर्षे तुम्ही शरद पवारांसोबत संसार केला. परंतु त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून तुम्ही तरी त्यांच्या मनातील ओळखू शकता का की त्यांच्या मनात काय चाललय ते - 
प्रतिभा पवारांनी उत्तर दिलं - ' नाही '



गाडगीळ - तुम्ही प्रतिभा ताईं बरोबर खरेदी ला जाता का??? 


पवार  माझ्या बायकोनी परिधान केलेली प्रत्येक साडी मी खरेदी केलेली आहे. त्यामुळे मला गेली पन्नास वर्षं आठवड्यातील सहा दिवस बाहेर दौऱ्यावर जाण्याची परवानगी मिळत राहिली.


शरद पवारांची त्याबाबत शेरेबाजी - गुगली गोलंदाजाच्या मुलीबरोबर लग्न केलं. त्यामुळे आयुष्यभर वीकेट जात राहिली आणि आताही गेली..


पवार 


गाडगीळ - बारामतीसारख्या ठिकाणी ग. दि. मांच्या नावाने तुम्ही कलादालन उभं केलत त्याच कारण काय - 
पवार - ग. दि. मांसोबत खूप जुना स्नेह होता. आटपाडीजवळच्या माडगूळ गावातील व्यक्ती फारसं शिक्षण नसताना एवढं उमदं काव्य लिहू शकते हे खुप कौतुकास्पद आहे.


लक्ष्मण शास्त्री जोशी - गोविंद तळवळकरांबाबत


गाडगीळ - तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी किंवा गोविंद तलवळकर यांच्याशी बोलताना राजकारण सोडून कोणत्या विषयावर बोलायचा. 
पवार - तर्कतीर्थ हे चालता बोलता शब्दकोष होते. त्याचबरोबर ते गमतीशीर रसायन होत. माझं वजन वाढल. त्यावर तर्कतीर्थ म्हणाले की हे बरं नाही , व्यायाम करायला पाहिजे ...आणि त्यांनी स्वत शीर्षासन करून दाखवलं


पवार : गोविंदराव तलवळकरांचं वाचन हा चमत्कार होता. गोविंदरावांनी इंग्रजी भाषेतील कोणत पुस्तक वाचल नाही हे शोधावं लागेल. यशवंतराव चव्हाणांचं वाचन तलवळकरांच्या जवळ जाणारं होतं.


 पवार - सर्वात आवडती गायिका - किशोरी अमोनकर , आवडते गायक - भीमसेन जोशी.


मोदींचे नाव न घेता


सुधीर गाडगीळ - तुमच्या विचारसरणीच्या विरुध्द टोकाची विचारसरणी असलेल्या लोकांशीही तुम्ही चांगले संबंध ठेवता हे तुम्हाला कस जमतं. 



पवार - राजकारणात मी वैयक्तीक द्वैष आणि वैर ठेवत नाही. आज माझं वय ७६ वर्षं आहे. पुढची पीढी काय करेल ते माहिती नाही. परवा अंकुश काकडेंनी निवडणुकीनंतर सर्व पक्षातील नेत्यांना कट्ट्यावर एकत्र केलं. तस एकत्र यायला हव. आता राजकारणात चांगले संबंध असले म्हणून सगळच काही खरं बोलल जात अस नाही. कोणी म्हणतं माझं बोट पकडून राजकारणात आले वगैरे. पण यातून एवढच समजायच की ....बोलायला हुशार आहे... पण ते तसं नाही हे पुणेकरांनी आता झालेल्या महापालिका निवडणुकीत सिध्द केलय.